सूर्यग्रहण 2022 मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी करु नये ही कामे,काय करावे ते जाणून घ्या*

*👉🔴👉यंदा दिवाळीच्या पर्वात 25 ऑक्टोबरा मंगळवारी सूर्यग्रहण आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ग्रहण म्हटले कि या काळात काय करावे काय करु नये असा विचार मनात येतो.यासह अनेकदा गरोदर महिलांना ग्रहण पाहण्यास मनाई केली जाते. चला तर ज्योतिष अभ्यासक विजय जोशी यांच्याकडून जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.*

*👉🟥🛑🟥👉काय करू नये*

*🔺🔺धार्मिक मान्यतेनुसार या काळात अन्न टाळावे. असेही म्हटले जाते की ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न देखील दूषित होऊ शकते. मात्र अत्यंत गरज भासल्यास जेवणात/ पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने मिसळावे.*

*🔺🔺सूर्यग्रहण काळात कात्री, चाकू, चाकू इत्यादी गोष्टींचा वापर टाळावा. तसेच शिवणकाम-भरतकाम करु नये, कारण सुई वापरण्यास देखील मनाई आहे. ग्रहण काळात ही कामे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.*

*🔺🔺जोपर्यंत तुमच्या शहरात सूर्यग्रहण दिसत नाही तोपर्यंत गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये.*

*🔺🔺यादरम्यान गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे टाळावा.*

*🔺🔺ग्रहण पाहणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणातून उत्पन्न होणारी अतिनील किरणे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्याही बंद ठेवा.*

*🔺🔺धार्मिक मान्यतेनुसार, या काळात गर्भवती महिलांनी झोपणे टाळावे. सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.*

*👉🟥🟥👉सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे*

*🔺🔺ग्रहण काळ हा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या काळात घराबाहेर पडायला सांगितले नसले तरी घरात आपण आपल्या इष्टदेवतेची मनोभावे उपासना करावी.*

*🔺🔺ग्रहण काळात गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त ध्यान धारणेवर लक्ष केंद्रीत करावे. यासह मेडीटेशनही करु शकता.*

*🔺🔺ग्रहण काळात ‘भगवत गीता’ यासारख्या मनोबल वाढविणाऱ्या किंवा आपल्या पसंतीच्या पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करावे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!