🚩🚩आरएसएसचे माजी प्रवक्ते आणि तरुण भारतचे माजी मुख्य संपादक मा. गो. वैद्य यांचं निधन 💐💐

*नागपूर, १९ डिसेंबर:-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.*

*विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल आणि अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.*

*मा. गो. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण नाव माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य. त्यांच्या पश्चाेत पत्नी, तीन मुली तसेच पाच मुले असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे मुलगेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. त्यापैकी डॉ. मनमोहन हे संघाटे सह सरकार्यवाह, तर श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हे हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक म्हणून काम पाहत आहेत.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!