आम्ही भोंगे बंद ठेवतो पण मंदिरांवरील लाऊडस्पीकर सुरू ठेवा;*
*👉👉पंढरपूर, शिर्डीतील मुस्लिम समाजाची मागणी*

*👉👉आम्ही मशिदींवरील भोंगे बंद ठेवतो पण मंदिरांवरील भोंगे सुरू ठेवण्याची मागणी पंढरपूर आणि शिर्डीतील मुस्लिम समाजाने केली आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची काकड आरती पहाटे साडेचार वाजता होते. या काकड आरतीला हजारो भाविक मंदिर परिसरात असतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काकड आरतीचा भोंगा बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. ही बाब लक्षात घेऊन पंढरपूरमधील मुस्लिम समाजाने एकत्रित बैठक घेऊन श्री विठ्ठल मंदिरावरील भोंगा सुरू ठेवा व पूर्ववत धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवा, त्यासाठी शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.*

*👉पंढरीनगरी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. हजारो भाविक दररोज पंढरपूरमध्ये येतात; परंतु सर्वांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या काकड आरतीला उपस्थित राहता येत नाही. म्हणून हजारो भाविक हे मंदिर परिसरात उभारून काकड आरती ऐकून समाधान व्यक्त करतात. म्हणून शासनाने विशेष बाब म्हणून पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या काकड आरतीला परवानगी द्यावी. आम्ही मशिदींवरील भोंगे सुरू करणार नाही; पण मंदिरांवरील भोंगा सुरू ठेवा, अशी मागणी इब्राहिम बोहरी यांनी केली आहे.*

*👉दरम्यान, साईमंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता पूर्ववत सुरू ठेवावेत, अशी मागणी येथील जामा मशीद ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदनही पोलिसांना देण्यात आले आहे. गेल्या अनेक कर्षांच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली, हे अतिशय वेदनादायक आहे. साईबाबा देवस्थान हे जागतिक कीर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबरच संदलचीही मिरवणूक असते. रोज सकाळी दहा वाजता हिंदू-मुस्लिम समाजबांधव एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहतात. त्यामुळे देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता ते सुरू ठेवावेत व विशेष बाब म्हणून त्यास मान्यता देण्यात यवी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!