किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास👉👉सीआयएसएफ कमांडरने दिले शूट अ‍ॅट साईटचे आदेश?*

*मुंबई:-भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने घेतली गंभीर दखल घेतली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर शुट एट साईटचे आदेश देण्यात येणार आहेत.*

*👉👉झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत जाब विचारला गेला. मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी बातचीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.*

*👉२३ एप्रिलला राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली. जमावानं त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यानंतर सोमय्या यांच्या कारची काच फुटली. ती काच सोमय्या यांच्या हनुवटीवर लागली. यात ते जखमी झाले. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने ही गंभीर बाब आहे. या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी सोमवार दि. २५ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सोमय्या यांनी हल्ल्याची सर्व माहिती अमित शहा यांना भेटून दिली. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, की आम्ही भेटून सर्व माहिती दिली. सात जणांवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर आहे. २० ते २५ मिनीटे चर्चा झाली. कालच्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली. एक स्पेशल टीम मुंबईला पाठवून चौकशी करण्याची मागणी आम्ही गृहमंत्र्यांना केली, असंही सोमय्या म्हणाले. महाराष्ट गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्या प्रकरणी बोलताना सोमय्या म्हणाले, बोगस तक्रार दाखल करुन, जखम बनावट होती का अशी चौकशी ते करत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त खालच्या पातळीवर जावून चौकशी करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. झेड सिक्युरीटी असताना पोलीस ठाण्यासमोर मारहाण होते ही खूप गंभीर आहे, असंही सोमय्या म्हणाले होते.*

*👉कमांडरचे आयुक्तांशी संवाद*

*सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ कमांडरने यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे.किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या जवानांना आता प्रत्येकवेळी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास घटनास्थळीच गोळ्या घालण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणने आहे.*

*👉किरीट सोमय्या यांच्या गाडीवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेच्या चार जणांना अटक केली. खार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाडेश्वर व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक हाजी हलीम खान आणि पक्षाचा कार्यकर्ता दिनेश कुणाल यांनाही अटक करण्यात आली आहे.*

*👉गृहमंत्रालयाकडे तक्रार*

*भाजपच्या महाराष्ट्र युनिटच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली आणि त्यांना सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती केली.*

*👉👉या हल्लाचं संजय राऊतांनी मात्र समर्थन केलं होतं. राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या निधीचा अपहार करणारा आरोपी. बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? Ins vikrant घोटाळा देशद्रोह आहे! अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. मात्र आता सोमय्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार अधिक गंभीर झाल्याचे दिसत आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!