तारुण्यातील मैत्री व चाळिशीनंतरची मैत्री यात बराच फरक असतो*

*तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो. कारण तेव्हा मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळूनपण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हा चाळिशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळतसुद्धा नाही.*

*जेव्हा चाळिशीच्या सागरात मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते की, ती मैत्री खूपखूप हवीहवीशी वाटत असते. नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो,*

*त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्त गप्पागोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादुःखात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटल तर वावगे ठरणार नाही. आपण कोणाचे कोणीच नसतो, पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.*

*आत्ता आयुष्याची चाळिशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हा या वळणावर जेवढे मित्रमैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….*

*कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठेपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे. ते आले की उतरावेच लागते… म्हणून जोपर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू म्हणून मैत्रीची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!*

*पण अशी मैत्री समजून घेणारे फार कमी असतात. ज्याला खरे निःस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान*
🙏🙏😊

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!