ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान घसा; फुप्फुसांना धोका कमी ; 👉जगातील सहा संशोधक गटांच्या अभ्यासातून निष्कर्ष*
*👉👉डेल्टा विषाणू हा थेट फुप्फुसांवर परिणाम करत होता. त्यामुळे रुग्णांमध्ये न्युमोनिया आणि गंभीर श्वसनविकारांचे प्रमाण प्रचंड होते.*
*पुणे :- कोरोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन हा विषाणू केवळ घशावर परिणाम करत असल्याने फुप्फुसांच्या आरोग्याला त्याचा धोका कमी असल्याचे दिसून येत आहे. जगभरामध्ये ओमायक्रॉनबाबत सुरू असलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. घशातील संसर्गामुळे त्याच्या संक्रमणाचा वेग अधिक राहील, मात्र फुप्फुसांवर परिणाम करत नसल्याने संसर्गाची तीव्रता कमी राहील, या अंदाजाला या संशोधनामुळे बळकटी मिळाली आहे.*
*👉ओमायक्रॉनने जगभरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. आतापर्यंत जगभर थैमान घातलेल्या सर्व करोना उत्परिवर्तनांच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग पाचपट आहे, मात्र तो आरोग्यावर गंभीर परिणाम करणार नाही, असे निरीक्षण दक्षिण आफ्रिकेतील उद्रेकानंतर नोंदवण्यात आले होते. जगातील सहा संशोधक गटांनी केलेल्या अभ्यासातून ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान फुप्फुसे नसून घसा हे आहे, हे स्पष्ट झाले आहे. फुप्फुसांच्या आरोग्यावर हा विषाणू थेट परिणाम करत नसल्यामुळे ओमायक्रॉन संसर्गाची गुंतागुंत कमी राहणार असल्याचे या संशोधनातील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.*
*👉हाँगकाँग, लिव्हरपूल, बेल्जियम आणि लंडन येथील विविध विद्यापीठांनी केलेल्या संशोधनांमधून या निष्कर्षांला दुजोरा देण्यात आला असून त्याबाबतचा शोधनिबंध ‘नेचर’ या नितकालिकाकडे पाठवण्यात आला आहे. करोना विषाणू संसर्गाचे रूपांतर महाकाय दुसऱ्या लाटेमध्ये करणाऱ्या डेल्टा उत्परिवर्तनासह चीनच्या वुहानमध्ये आढळलेल्या मूळ करोना विषाणूपेक्षा ओमायक्रॉन कित्येक पटीने सौम्य आहे. लिव्हरपूल विद्यापीठाने प्राण्यांवर केलेल्या संशोधनातील निष्कर्षही सकारात्मक आहेत. ओमायक्रॉन उत्परिवर्तनाचा संसर्ग झालेल्या प्राण्यांमध्ये वजन कमी होणे, गंभीर न्युमोनिया यांसारख्या आजाराचे गंभीर दुष्परिणाम दिसले नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मात्र, या माहितीमुळे आपण गाफील राहणे योग्य नाही. ज्या नागरिकांना इतर गुंतागुंतीचे आजार आहेत, त्यांच्यासाठी ओमायक्रॉनही गंभीर ठरू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी, लसीकरण आणि करोना प्रतिबंधात्मक वर्तन अत्यावश्यकच असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.*
*👉तज्ज्ञांचे आवाहन*
*डेल्टा विषाणू हा थेट फुप्फुसांवर परिणाम करत होता. त्यामुळे रुग्णांमध्ये न्युमोनिया आणि गंभीर श्वसनविकारांचे प्रमाण प्रचंड होते. साहजिकच त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊन अनेक रुग्ण दगावले. ओमायक्रॉन फुप्फुसांवर हल्ला करत नसल्याने त्याचा संसर्ग केवळ घशापुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा प्रसार वेगवान होईल, मात्र जीवाला असलेला धोका कमी असेल. असे असले तरी ज्यांना सहव्याधी, श्वसनविकार आहेत, रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, किंवा ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, अशा नागरिकांसह सर्वानी करोना प्रतिबंधात्मक नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन ससून रुग्णालयाचे ज्येष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी केले.*
*👉मुखपट्टी अनिवार्यच*
*डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन उत्परिवर्तन सौम्य असले तरी ते घशात संसर्ग निर्माण करते.त्यामुळे संसर्गाच्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असले तरी संसर्गापासून बचावासाठी मुखपट्टीचा वापर अनिवार्यच आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.*
