आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण सुरू, तुम्हाला ‘ही’ लस मिळणार..

👦🏻👧🏻 भारतात 15 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी आज 3 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होत आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ कमी होण्यासाठी कोविन पोर्टलच्या (Cowin) माध्यमातून लसीकरणासाठी दोन दिवसात 8 लाखांहून अधिक पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांना लस दिली जाणार आहे.

💉 *लसीकरण मोहिमेविषयी सविस्तर:*

▪️ राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, राज्यात 15-18 वर्ष वयोगटातील सुमारे 60 लाखांवर मुले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत. राज्यभरातील 650 केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण होणार आहे.

▪️ लहान मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी असल्याने मुलांसाठीच्या लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असेल, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

▪️ प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

▪️ मुलांना लसीकरणासाठी शाळेचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड (किंवा इतर) लस घेण्यासाठी घेऊन येणं आवश्यक असेल.

▪️ पालकांच्या किंवा स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

▪️ मुलांना थेट केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

🗣️ *केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले…*

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शक्य असल्यास स्वतंत्र केंद्रे सुरू करा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी राज्यांना केली. मुलांना फक्त कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आह़े 18 वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन्ही लशी देण्यात येत असल्याने लशींबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंडाविया यांनी राज्य सरकारांना केली आहे.
➖➖➖➖

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!