अभाविप बारामती जिल्हा अभ्यास वर्ग उत्साहात संपन्न.
दि.18 व 19 डिसेंबर 2021 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती जिल्हा अभ्यास वर्ग इंदापूर येथील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती शहर अध्यक्ष श्री राऊत सर व इंदापूर शहर अध्यक्ष श्री प्रशांत बंगाळे सर यांनी केले.
या दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये इंदापूर शहर कार्यकारिणीतील काही घोषणा केल्या.
त्याचबरोबर अभाविप बारामती जिल्हा सह-संयोजक अशी जबाबदारी अजय चव्हाण व विक्रम शिंदे यांना देण्यात आली.
या अभ्यास वर्गासाठी पुणे विभाग संघटन मंत्री रोहित(दादा) राऊत, पुणे विभाग संयोजक सौरभ शिंगाडे, बारामती जिल्हा संयोजक ओंकार कुरुमकर, विस्तारक गोरखनाथ केंद्रे, इंदापूर तालुका प्रमुख भरत आसबे, बारामती शहरमंत्री अण्णा धुलुगुडे, इंदापूर शहर मंत्री अवधूत बाचल, इंदापूर सहमंत्री ऋतुजा कदम, शितल भंडलकर, रूपाली नरुटे, स्वप्नील भंडलकर इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
