*‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट यांची कार्यशाळा*
नमोन्युजनेशन:- संपादकीय
पुणे दि.20-देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी राज्यात राबविण्यात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत अहमदनगर, पुणे व सोलापूर येथे निवड झालेल्या समुदाय आधारित संस्थांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे 20 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता अल्प बचत भवन कौन्सिल हॉल पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री, कृषि हे उपस्थित राहणार आहेत. कृषि तथा प्रकल्प संचालक धीरज कुमार हे ‘स्मार्ट प्रकल्पातील घटक’ या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. ‘स्मार्ट प्रकल्पाची ओळख व मुल्यासाखाली विकास’ या विषयावर अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, ‘स्मार्ट व प्रकल्प अहवाल तयार करणे’ या विषयावर आत्माचे संचालक किसान मुळे, ‘स्मार्ट प्रकल्पातील महिलांचा सहभाग’ या विषयावर डॉ. संगीता शेटे आणि प्रकल्पासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे याबाबत ‘स्मार्ट’ समन्वयक जीवन बुंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यायसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून 64 आणि पुणे 22 व सोलापूर जिल्ह्यातून 17 समुदाय आधारित संस्था/ शेतकरी उत्पादक गट यांचा समावेश असून या संस्थांचे सदस्य, महिला प्रतिनिधी तसेच त्या संस्थांचे नोडल अधिकारी व खरेदीदार आणि कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे यांनी केले आहे, असे विभागीय कृषि सहसंचालक यांनी कळविले आहे.
