बार्टीच्यावतीने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास 22 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ
नमोन्युजनेशन :- संपादकीय
पुणे, दि.15: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, पुणे) बँक, रेल्वे, भारतीय जीवन विमा तसेच तत्सम संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, पोलीस व मिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याकरिता 22 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणास प्रवेश मिळावा यासाठी चाळणी परीक्षा आता रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. वाढवलेल्या मुदतीनुसार विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी बार्टीच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
