सहज एका रूद्राक्षाचा फोटो दिसला अन आठवलं की हे महादेवाचे अश्रू आहेत अशी पोस्ट टाकावी पण म्हटलं जोपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणिही मानणार नाही की हे अश्रू आहेत. तर आता पाहुया खरंच आहेत का…

1. मानवाच्या अश्रुंमधील घटक- पाणी
इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम). हेच अश्रूंना त्यांची खारट चव देतात.
प्रथिने (लाइसोझाइम, लैक्टोफेरिन, लिपोकॅलिन आणि आयजीए).अश्रूंमध्ये ब्लड प्लाझ्माच्या प्रथिनांपैकी फक्त एक दशांश असते.
लिपिड्स आणि म्युसिन्स

2.आता रूद्राक्षातील रासायनिक घटक कोणते पाहुया
रुद्राक्ष मणी हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन एकत्रित स्वरूपात असतात. रुद्राक्षाच्या मणीतील वायू घटकांची टक्केवारी:
कार्बन – ५०.०३१%
नायट्रोजन – ०.९५%
हायड्रोजन – 17.897%
ऑक्सिजन – 30.53%

आता आणखी थोडं खोलात जाऊन पाहूया यात काय काय आहे
रुद्राक्षाच्या फळांमध्ये अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन, स्टिरॉइड्स, ट्रायटरपेन्स, कार्बोहायड्रेट्स आणि कार्डियाक ग्लायकोसाइड्स असतात.त्यामध्ये रुद्राकाईन(एक अल्कलॉइड देखील आहे जो 1979 मध्ये रुद्राक्ष फळामध्ये सापडला होता)

आता या सर्वच रासायनिक घटकांचा बेस वरती दिल्या प्रमाणे आहे जे मानवाच्याही अश्रूंमधे असतात(आपल्या अश्रूंत कमी घटक आहेत जे रूद्राक्षात जास्त आहेत आणि त्यात अॅश म्हणजे भस्मही आढळून आले आहे)

आता रूद्राक्षाचा एक औषध म्हणून वापर काय ते पाहुया

लोक औषधांमध्ये याचा उपयोग तणाव, चिंता, नैराश्य, धडधडणे, मज्जातंतू दुखणे, अपस्मार, मायग्रेन, एकाग्रतेचा अभाव, दमा, उच्च रक्तदाब, संधिवात आणि यकृत रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधी पद्धतीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने हृदय आणि मज्जातंतूंवर सकारात्मक परिणाम होतो.

आणि हो हे मी नाही, इंटरनॅशल फार्मासिस्ट जर्नलने सिद्ध केले आहे.

सनातन पूर्वज राॅक्स, लिबरल लोक्स शाॅक्स…

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!