३ डिसेंबर ६१ वा जागतीक अपंग दिन नवजीवन अपंग शाळेत साजरा
पंढरपुर शहरात असलेली नवजीवन अपंग शाळा अपंगाची जीवन वाहीनी आहे डॉ सोनवणे सर यानी ६१ जागतिक अपंग दिन साजरा करत असताना सरस्वती च्या फोटो प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले प्रसंगी प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले शहर अध्यक्ष गणेश ननवरे जिल्हा सचिव संजय जगताप संपर्क प्रमुख दत्तात्रेय जमदाडे म. श. अध्याक्षा सुनिता लवंड, हणमंत चव्हाण, अमर प्रक्षाळे, या सह अनेक प्रहार सैनिक व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.प्र स्तावित मोहन थोरात सर यानी केले.
प्रहार संघटना जिल्हा सचिव
संजय जगताप यानी ६१ व्या जागतिक अपंग दिना निमित्त शालेय अपंग विद्यार्थाना मनोग मार्गदर्शन केले दिव्यांग हा मानव समाजातील सर्वात शेवटचा घटक आहे या घटकाकडे मानवाचा दृष्टीकोन वेगळा होता १९९२ पासुन हळूहळू दिव्यांग दिन साजरे होत आसताना जागृकता निर्माण केली आणि शासनाच्या ३% योजनाची अंलबजावणी आम्ही सोलापुर जिल्हा भर चळवळ उभी करून दिव्यांग घटकाला न्याय देण्याची भुमिका केली दिव्यांग निधी५% करण्यत आला शासनाच्या योजना शेवटच्या दिव्यांग पर्यन्त पोहोचवता आल्या खर्या आज जागतिक अपंग दिनी अभिमानाने सांगावे वाटते शासन आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. समाजसेवक उभे आहेत. तसेच डॉ सोनवणे यानी जागतिक अपंग दिना सर्व दिव्यांग ना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!