आज इंदापूर महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनास माजी कृषी उत्पन्न सभापती पांडुरंगतात्या मारकड यांच्या नेतृत्वात तेजपृथ्वी ग्रुप तर्फे जाहीर पाठिंबा
इंदापूर येथे महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत करून शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे धरणे आंदोलन चालू आहे त्यास माजी कृषी उत्पन्न सभापती पांडुरंग तात्या मारकड यांच्या नेतृत्वात जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळेस पांडुरंग तात्या मारकड यांच्या बरोबर 250ते300 शेतकरी उपस्थित होते यावेळेस पांडुरंग तात्या मारकड यांनी सांगितले की इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कट करून जे नुकसान केले आहे त्याची भरपाई कोण देणार एक तर कोरोणामहामारीने लोकांना जगणे मुश्कील झाले आहे आणि अशातच आत्ता वीज कट करून लोकांची उभी पिके जळत आहेत . शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा यासाठी आजचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे .तसेच यावेळेस बोलताना तेजप्रुथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात म्हणाले की शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीतुन चालला आहे कोरोना पासून ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे ना शेतकर्याच्या हाताला काम आहे आणि अशातच हे सरकार विज कनेक्शन कट करून शेतकऱ्या वर अन्याय करत आहे. आम्ही सामाजिक काम करतो आणि जो शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल त्यानां तेजप्रुथ्वी ग्रुपचा नेहमी पाठिंबा राहणार .आज या आंदोलनास तेजप्रुथ्वी ग्रुप पाठिंबा देत आहे.तेजप्रुथ्वी ग्रुप नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे मग तेथे कोणताही पक्ष असो कोणती जात असू आम्हाला शेतकऱ्यांचे हित पाहिजे .याचा विचार करून शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची वीज पुर्ववत करावी .यावेळेस माननीय नामदार हर्षवर्धन पाटील माजी सभापती महेंद्र दादा रेडके ,विलास बापू वाघमोडे , अप्पासाहेब जगदाळे, पांडुरंग तात्या मारकड ,परशुराम काका रेडके ,सुग्रीव बोंगाणे ,हनुमंत यमगर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
