*ऊँ नमःशिवाय*
*श्री गणेशाय नमो नमः*
*श्री कुलदेवता नमो नमः*
*श्री कुलदेवी माता नमो नमः*
*श्री ग्राम देवी माता नमो नम* :
*श्री नवदूर्गा माता नमो नमः*
*या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।*
*अर्थ : जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये मातृरूपाने स्थित आहे त्या श्रीदुर्गादेवीला मी त्रिवार नमस्कार करतो.*
*नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नम: ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.*
*नवरात्रसंकल्प*
॥ श्रीमन्महागणाधिपतये नमः ॥
अद्य पूर्वोच्चरित । फलप्राप्त्यर्थ सावर्णिसगोत्रोत्पन्नस्य यजमानस्य सकुटुंबस्य सपरिवारस्य द्विपादचतुष्पादसहितस्य मम क्षेम – स्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्धि – सकलापच्छांति – सर्व शत्रु परजाऽखंडैश्वर्याभिवृद्धिसकलेष्टमनोरथसिद्धिसद्बुद्धिप्राप्तिपूर्वकसत्कीर्तिसिद्धि – पुत्रपौत्राखंडदंडायमानसंततिप्रार्तिअस्वगतराज्यस्य स्थिरीकरणद्वारा च श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वतीत्रिगुणात्मकश्रीदुर्गाभवानीशंकरप्रीत्यर्थं प्रतिवार्षिकविहितमाश्विन शुद्ध प्रतिपद्दिनमारभ्य महानवमीदिनपर्यंत ब्राह्मणद्वारा त्रिकाल महापूजोपवासपूर्वक शारदीय नवरात्रमहोत्सवाख्यं कर्म करिष्ये । तथा च तदंगतया शतावृत्तिभिः श्रीसूक्तजयं तावत्संख्याकं बटुभैरवस्तोत्रजपं तावत्संख्याकं सौदर्यलहरीस्तोत्रजपं तावत्संख्याकं शिवकवचस्तोत्रमालामंत्रजपं तावत्संख्याकं महिम्नस्तोत्रजपं तथा चायुतसंख्याकं महामृत्युंजयजपं तावत्संख्याकमादित्यादिनवग्रह मंत्र जपं तथा च लघुरुद्रजप प्रतिदिनं चाष्टोत्तरशतनमस्कारांस्तावतीः प्रदक्षिणश्च करिष्ये । तथा च तन्निमित्ततया मार्कंडेयपुराणांतर्गत श्रीसप्तशतीस्तोत्रमालामंत्रस्मादौ कवचार्गलाकीलकयुतस्यांते रहस्यत्रयसहितस्य प्रत्यावृत्यष्टोत्तर शतनावर्ण मंत्रजप संपुटितस्य सहस्रावृत्तिजपं तथा च तद्दशांशेन विहितहोम प्रत्याम्नायहिगुणजपं तथा च शतावृत्तिभिर्भवानी सहस्रनामस्तोत्र जपं तथा चायुत संख्याकं मूलमंत्रजपं तावत्संख्याकं दुर्गामंत्रजपमद्यप्रभृति यावत्समाति ब्राह्मणद्वारा करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनपूर्वकं स्वस्तिपुण्याहवाचनं मातृकापूजनं वसोर्धारापूजनमायुष्यमंत्रजपं नांदीश्राद्धमाचार्यवरणं च करिष्ये ॥ इति संकल्पः ॥
*ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम:।*
*नवदुर्गेचे पहिले रूप (१)*
*शैलपुत्री देव*
*अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ*
*वाहन : गो माता*
दुर्गेचे पहिले रूप ‘ शैलपुत्री’ या नावाने ओळखले
जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे.
पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म
घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा
आणि आराधना केली जाते. या पहिल्याच
दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला
‘मूलाधार’ चक्रात स्थिर करतात. या
दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि
डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या
पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची
कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे
नाव ‘सती’ असे होते. तिचा विवाह शंकराशी
झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या
यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित
केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे
समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र
इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ
प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की
प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर
नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना
यज्ञासाठी बोलावले आहे.
परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही.
अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य
वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले
तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा
यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते.
तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी
जाण्याची परवानगी दिली.
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे
स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची
वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी
देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते.
नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत
राग आला. तिथे शंकराच्या प्रती
तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून
आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक
शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने
संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य
होते, असे तिला वाटले
आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची
जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न
झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून
घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर
त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून
प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने
पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या
कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती
‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली.
पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’
देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला
होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती
शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून
नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि
शक्ती अनंत आहे.
*ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम* :।
*ॐ शं शैलपुत्री देव्यै: नम* :
*स्तोत*
*प्रथम दुर्गा त्वंहि भवसागर: तारणीम्।*
*धन ऐश्वर्य दायिनी शैलपुत्री प्रणमाभ्यम्॥*
*त्रिलोजननी त्वंहि परमानंद प्रदीयमान्।*
*सौभाग्यरोग्य दायनी शैलपुत्री प्रणमाभ्यहम्॥*
*चराचरेश्वरी त्वंहि महामोह: विनाशिन।*
*मुक्ति भुक्ति दायनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम्॥*
*स्तुति मंत्र :- या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता |*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||*
*मूलमंत्र:-*
*वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम् | वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ||*
*शैलपुत्री की आरती*
शैलपुत्री मां बैल पर सवार। करें देवता जय जयकार।
शिव शंकर की प्रिय भवानी। तेरी महिमा किसी ने ना जानी।
पार्वती तू उमा कहलावे। जो तुझे सिमरे सो सुख पावे।
ऋद्धि-सिद्धि परवान करे तू। दया करे धनवान करे तू।
सोमवार को शिव संग प्यारी। आरती तेरी जिसने उतारी।
उसकी सगरी आस पुजा दो। सगरे दुख तकलीफ मिला दो।
घी का सुंदर दीप जला के। गोला गरी का भोग लगा के।
श्रद्धा भाव से मंत्र गाएं। प्रेम सहित फिर शीश झुकाएं।
जय गिरिराज किशोरी अंबे। शिव मुख चंद्र चकोरी अंबे।
मनोकामना पूर्ण कर दो। भक्त सदा सुख संपत्ति भर दो।
*देवी :बीज मंत्*
*शैलपुत्री : ह्रीं शिवायै नम:।*
*आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस…*
आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो । प्रतिपदेपासुन घटस्थापना ती करुनि हो ।
मुलमंत्रजप करुनी भोवतें रक्षक ठेउनि । हो ब्रह्मविष्णुरुद्र आईचे पुजन करिती हो ॥ १ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ उदो. ॥ २ ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो । अष्ठभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो. ॥ ३ ॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ॥ उदो.॥ ४ ॥
पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपीजनें तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।आनंदे प्रेम ते आले सद्भावें क्रीडतां हो ॥ उदो. ॥ ५ ॥
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो । घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ॥
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफलांचा हो । जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो.॥ ६ ॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरीहो । तेथें तू नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो ॥
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । भक्तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ॥ उदो. ॥ ७ ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो । सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिले शरण आलो तुजलागुनी हो । स्त्नपान देऊनि सुखी केले अंत:करणी हो ॥ उदो. ॥ ८ ॥
नवमीचे दिवशीं नवदिवसाचे पारणें हो । सप्तशतीजप होम हवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो । आचार्याब्राह्मणां तृप्त केले कृपेकरुनी हो ॥ उदो. ॥ ९ ॥
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोलंघनी हो । सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो । उदो. ॥ १० ॥
