वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते”

*मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय ?*

*काल परवा एक सुंदर संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला !, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहले होते;*

” *वाकड्याना सोडून सरळ जे*असतात त्यानाच ठोकले जाते*”

*मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?*

*एक मजूर सहजतेने म्हणाला*
*”साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,*
*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे*

*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्रामचा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल”.*

*परंतू*

*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*

*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*
बर
*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*
तर
*चालती गाडी पंचर करणे*
*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*
*असे उपदव्याप करतो*

*त्या अशिक्षिताने माझे डोळे उघडले*,
*आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, तो सुरुवातीला नीट ठोकला गेला नसल्याने (त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने) तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून* *चांगल्या चांगल्यांना त्रास होऊ शकतो*.

*शेवटीं काय माणसांवर होणारे संस्कार सर्वात महत्वाचे असतात…*

🙏🙏🙏🙏

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!