*शिवशाही शेतकरी संघटना काळाची गरज*
आज शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा आरडे यांची पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण (भैय्या) माने यांनी सदिच्छा भेट घेतली. त्या प्रसंगी त्यांनी शिवशाही शेतकरी संघटनेच्या उपक्रमांची प्रशंसा केली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लढाऊ संघटना स्थापन करणार्या संस्थापक अध्यक्ष यांचे कौतुक केले.
आजचा शेतकरी हा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहे. आसमानी व सुलतानी संकटाने शेती धंदा तोट्यात आला आहे. कोरोना covid-19 या महामारी मध्ये शेतीचे अर्थशास्त्र बिघडून गेले आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून शेतीची वीज जोडणी तोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत असलेली शिवशाही शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे समस्यांचे निराकरण करील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . या प्रसंगी बोलताना प्रवीण (भैय्या) माने यांनी शेतकरी संघटनेची गरज व उपयुक्तता याबाबत चर्चा केली. संस्थापक अध्यक्ष नितीन दादा आरडे व त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी उपनगराध्यक्ष मा. अरविंद (तात्या) वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे तालुका अध्यक्ष मा. संदिपान कडवळे सर, ज्येष्ठ पत्रकार मा. सुधाकरजी बोराटे शिवशाही शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब लोंढे उपस्थित होते.

