पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी- राज्यपाल

पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी, पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज घडवत असतो. समाजात ज्या ठिकाणी अनुचीत प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं दिला जाणारा २०२० चा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचं वितरण राजभवन इथं कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!