*मारुतराव वणवे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी*
*मारुतराव वनवे यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार*
भाजपचे भिगवण येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतराव वणवे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. माजी मंत्री व भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) येथील एका कार्यक्रमात हे नियुक्तीपत्र वणवे यांच्याकडे सुपूर्द करून त्यांचा सन्मान केला तसेच त्यांचे अभिनंदन केले.
मारुतराव वणवे यांचे इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यात भाजपच्या वाढीसाठीचे योगदान व सक्रियता पाहून पक्षाने त्यांना कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली आहे.हर्षवर्धन पाटील यांनी त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या नियुक्तीबद्दल वणवे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या या संधीचे सोने करू, पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेऊ असे वणवे यांनी सांगितले.
यावेळी संदीप खुटाळे, बाळासाहेब भांडवलकर नगरपालिका गटनेते कैलास कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!