पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच भारताचे नवनिर्माण केलं का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच भारताचे नवनिर्माण केलं का ?

अमेरिकेच्या प्रसिद्ध प्रश्न/ उत्तर देण्याचे वेब पोर्टल Quora मध्ये.. जय अगरवाल यांनी दिलेले प्रतिउत्तर..

अमेरिकेच्या फेडरल सरकारमध्ये जय अगरवाल कार्यरत आहेत…

त्यांचे उत्तर :

मी भारतात जवळपास गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास नाही आहे म्हणून मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून याचे उत्तर देऊ शकतो…

लक्षात घ्या.. मी अमेरिकन नागरिक असल्याने.. मी भारताच्या निवडणूकमध्ये मत देऊ शकत नाही आणि मला भारतीय निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा पण नाही…म्हणूनच ही वस्तुनिष्ठता मांडत आहे..

मी इथे फक्त दोन घटनांचे वर्णन करणार आहे..आणि मी त्यासाठी कुठल्याही प्रकारची रटाळ आकडेवारी मांडणार नाही..

घटना 1 –

नेहमीच्या दिनक्रमानुसार वाशिंग्टन DC मध्ये मी Uber टॅक्सी घेतली… टॅक्सीचा ड्रायव्हर अफगाणी होता… काही मिनिटानंतर त्याने मला विचारले.. तुम्ही भारतीय आहे का ?..मी उत्तर दिले हो.. आणि तो स्मित हास्य देत म्हणाला की तो बॉलीवूड चा खूप मोठा चाहता आहे.. त्यावर मी पण त्याला स्मितहास्य दिले… त्याचा दुसरा प्रश्न, तुम्हाला माहीत आहे काय ?, कोण व कधी कुणी मोदींवर सिनेमा बनवणार ?.. हे ऐकून मी थोडासा शॉक झालो, त्याच्या सिनेमाच्या सल्ल्याने नाही पण त्याला सुद्धा मोदी माहित होते म्हणून.. असो, मी त्याला विचारले की मोदींचा सिनेमा का ? तो टॅक्सी ड्रायव्हर उत्तरला की अफगाणिस्तानात मोदींना जादूगार सारखे समजले जातं..आणि अफगाणिस्तानला भारतासारखे बनवायला…मोदी सारखा नेता अफगाणिस्तानला मिळावा म्हणून अफगाणी रोज प्रार्थना करतात..

घटना 2 –

माझा चांगला मित्र, नायजेरियन सहकर्मचारी इतेवगु… रोज सकाळी आपल्या कामाची सुरुवात, नायजेरियन राष्ट्राध्यक्ष बुहारीला शिव्या श्राप देऊन सुरू करतो… त्याच्या एक्सपर्ट मतानुसार , बुहारीने नायजेरिया पूर्णतः बुडवला.. नंतर तो त्रासदायक नजरेने माझ्याकडे बघतो आणि म्हणतो तुम्हाला कशाची काळजी नाही.. तुमच्याकडे तर नरेंद्र मोदी आहे.. बघा आज भारत कुठे आहे… ह्या सकाळच्या रुटीन नंतर आम्ही रोज सोबत कॉफी घेतो..

तर, दोन संपूर्णतः भिन्न अभारतीय… ज्यांचा कुठल्याही राजकीय अजेंडा नाही… त्यांना त्यांचा देश चालवायला मोदी सारखा कुणीतरी पाहिजे कारण त्यांना विश्वास आहे की त्यांच्या देशाचे भविष्य मोदीच बदलू शकतात..

त्यांना कुणीही हा प्रचार करायला काही दिले नाही..

त्यांनी फक्त बघितले.. मोदींच्या नेतृत्वात भारताने काय मिळवले आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर भरतासाची प्रतिष्ठा कशी वाढली…

कुणीही परिपूर्ण आहे असे मी म्हणत नाही, पण माझ्या 25 वर्षाच्या अमेरिकेतील वास्तव्यात, मी कधीच कुणाला भारताला एवढा मान, सन्मान देतांना पाहिलं नाही… जेवढा मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारताला मान, सन्मान मिळत आहे…. याचे श्रेय मोदींना द्यावेच लागेल ज्याचे ते खरे मानकरी आहे..

द्वेष करणारे द्वेष करतच राहतील..पण हे निर्विवाद मोदींची जादू आहे.. प्योर अँड सिम्पल…