राज्य विश्वकोष निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ. प्रकाश पवार
नमोन्यूजनेशन :- रामवर्मा आसबे

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यपदी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश पवार यांची निवड झाली.

डॉ. प्रकाश पवार हे कळंब ( वालचंदनगर ) ता. इंदापूर , जि. पुणे येथील आहेत . ते शिवाजी विद्यापीठात 2017 ते 2019 या काळात ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

डॉ.प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विभागाचे अभ्यासक व राजकीय
विश्लेषक म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे. त्यांच्या दोन पुस्तकांना राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या निवडीचे कळंब-इंदापूर परिसरामध्ये स्वागत होत आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत कलंब परिसरात होत आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!