📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
*अनिश्चित काळातील निश्चित कर्तव्य*
🎯✈️🎯
जीवनातील अनिश्चिततेचा काळ
फार भयानक असतो.
अशा काळात आपल्यासमोर
कोणताच मार्ग दिसत नाही.
जीवनाची दिशा दिसण्यासाठी
स्थैर्य असावे लागते,
💀आपली मानसिकता अस्थिर असेल तर
सोपा आणि जवळचा मार्गही दिसत नाही.
😷अशी चाचपडत चालणारी माणसे
धडकून पडल्याशिवाय रहात नाहीत.
⚔️ परिस्थितीशी दोन हात करत असताना,⚔️
स्थैर्य खूप महत्त्वाचे असते.
✊🏾 *आढळ आणि ठाम निश्चय*✊🏾
*स्थिरतेतच केला जातो.*
💀आज या महामारीमध्ये💀
आर्थिक, शारीरिक आणि मानसिक
या सर्वच पातळीवर आपण अस्थिर आहोत.
😓 *जगण्याचाच जेथे भरवसा राहिला नाही, तेथे बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात.*
_अशा काळात हातपाय गाळणारी माणसे, हताश होणारी माणसे, नैराश्यग्रस्त होतात आणि जवळ सर्व काही असून भिकारी झाल्यासारखी वागतात._
⚔️माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत व्यवहारिकदृष्ट्या अनिश्चितता होती. त्यांच्याही जीवाचा क्षणाचाही भरवसा नव्हता, तरीही त्यांच्या हातून जे अलौकिक कार्य घडले त्याची चिकित्सा केली असता, एकच गोष्ट अधोरेखित होते, 💎ती म्हणजे
*जीवनाची अनिश्चितता ही _भविष्याच्या_ हातात सोडावी आणि _वर्तमान काळातील_ आपल्या हातात असलेल्या क्षणाचे सोने करावे.*
⚔️कल्पना करा अफजलखानाला मारून, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून म्हणजेच मरणाच्या जबड्यातून सुटून ११ महिन्यांनी या मायलेकरांची भेट झाली होती. त्यानंतर लगेच शाहिस्तेखानावर छापा घालण्यासाठी माँसाहेब जिजाऊ, शिवरायांना प्रवृत्त करतात आणि त्यांच्या हातून ते करूनही घेतात.
✊🏾जिवावरचा प्रसंग आला असता, माँसाहेब जिजाऊनी शिवरायांच्या मनाला कायम खंबीर बनवले आणि स्वतःही खंबीर राहिल्या, त्याचे कारण
भक्कम मानसिक स्थैर्य आहे.
➖ *हरलेले मन*➖
कसलेल्या शरीरालासुद्धा जिंकू देत नाही.
➖ *अजिंक्य मन*➖
जीवनातील कोणत्याही संकटावर
यशस्वी मात करते, मग
शरीर कसेही असू देत.
🖇️आज शरीराच्या प्रतिकार शक्तीसाठी
व्यायाम गरजेचा आहे आणि
🖇️ मनाच्या अजिंक्यतेसाठी
ध्यान गरजेचे आहे.
🎭 *भविष्य/Future*🎭
नेहमी अनिश्चितच असते,
कितीही काळजी घेतली तरी
परिस्थितीनुसार ते बदलत असते, त्यामुळे
आपल्या कोणाच्याही हातात भ|वि|ष्य नसते,
✊🏾असते, ते फक्त व|र्त|मा|न .
*मरणाच्या भितीने*
*वर्तमान खराब करू नका* आणि
*अनिश्चित असलेल्या भविष्याचा*
*विचार करू नका,*
_हेच जगण्याचे |शि|व|सू|त्र| आहे_
⛳⛳
*प्रारब्धेची जोडे धन l प्रारब्धेची वाढे मान ll*
*सोस करिसी वाया l भजे मना पंढरीराया ll*
*प्रारब्धेची होय सुख l प्रारब्धेची पावे दुःख ll*
*प्रारब्धेची भरे पोट l तुका करीना बोभाट ll*
➖बि न धा स्त ज गा➖
यासाठीच आपला जन्म आहे.
🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *_डॉ. आसबे ल.म._*✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞
