कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याची इंदापुरकरांनचि  मागणी.

इंदापूर शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरु असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी समस्त इंदापूरकरांनी केली आहे.

तालुक्यात कोरोना संसर्ग आजाराचा फास हा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रुग्णांची संख्या दिवसाला तीनशे पार होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचाराकरीता दाखल होत आहेत. त्यातच संशयीत नागरिकांची आरटीपीसीआर, रॅपीड अँटीजन चाचणीही ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात होत आहे. तसेच शासनाकडून वयोवर्ष ४५ वयाच्या पुढील नागरिकांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेचे लसीकरण केंद्रही याच याठिकाणी आहे.

यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांची मोठी वर्दळ पहावयास मिळत आहे.त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने या परिस्थितीचे भान ठेवून तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरु असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र हे शहरामध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, अशी मागणी इंदापूरातील नागरिक करीत आहेत.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!