*होम क्वारंटाईन कोवीड-१९ पेशंट ठरत आहेत सुपर स्प्रेडर..!*

प्रशासनाच्या नियमानुसार *होम क्वारंटाईन* केलेली *कोवीड-१९ पेशंट* हे *१४ ते १७ दिवस* सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे. परंतू *होम क्वारंटाईन* केलेले कोवीड-१९ पेशंट *५ ते ७ दिवसात* बाहेर पडुन *सुपर स्प्रेडर* ठरत आहेत. हे *सुपर स्प्रेडर* स्वतःच्या *परिवारासाठी* आणि *समाजासाठी* सुध्दा *घातक* होत चालले आहेत.

*कोवीड-१९ पाॅजीटिव्ह* पेशंट हा *१२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग* पसरवु शकतो. असे असून देखील बरेचसे कोवीड-१९ पेशंट हे,

▪️मला काही लक्षणं नाहीत
▪️मी आता बरा आहे
▪️मला काहीच त्रास नाही होत
▪️मला दम पण नाही लागत
▪️माझं सॅच्युरेशन (ऑक्सिजन पातळी) ही नाॅर्मल आहे

अशी कारणं सांगत *५ ते ७ दिवसात घराच्या बाहेर* पडुन प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावरबसवून *सुपरस्प्रेडर* बनत आहेत.

*प्रशासनाला, सरकारला दोष देत* बसण्यापेक्षा आपण *प्रशासनाला काय* *मदत करु शकतो* हा विचार करा. *सरकार, प्रशासन* त्याच्या पातळीवर पुर्ण पणे काम करतंय, आपण *सुजान नागरिक* म्हणून प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

*होम क्वारंटाईन कोवीड-१९ पाॅजीटिव्ह* असलेल्या प्रत्येक *व्यक्तीने* आपली *सामाजिक जबाबदारी* व *प्रशासनाला मदत* म्हणुन खारीचा वाटा उचलत आपला *१४ ते १७* दिवसांचा *होम क्वारंटाईन* कालावधी *घरात राहुन पुर्ण* केला पाहीजे, जेणेकरून तुम्ही *सुपर स्प्रेडर* ठरणार नाही.

🙏🏼 *जनहितार्थ जारी*🙏🏼

नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!