नागडे-उघडे, वेडे-बागडे काँग्रेसी दिल्लीतील एआय समिटमध्ये तमाशे करत राहिले आणि त्याचवेळी गुगलने भारतात एका महाकाय एआय डेटा सेंटरच्या उभारणीत 15 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. गूगलची ही अमेरिकेबाहेर सगळ्यात मोठी गुंतवणूक असेल.
विशाखापट्टण येथे आकाराला येणारं हे ‘एक गिगावॅट एआय डेटा सेंटर हब’ म्हणजे एआयच्या जागतिक भविष्याला नवी दिशा देणारी एक ‘गेम चेंजर’ योजना आहे.
वेगवान इंटरनेटशिवाय एआयचा उपयोग होऊ शकत नाही. यासाठी…
भारत ते दक्षिण आफ्रिका
भारत ते सिंगापूर
भारत ते ऑस्ट्रेलिया
…अशा नव्याकोऱ्या इंटरनेट केबल्स समुद्राखालून टाकण्यात येत आहेत.
आजवर अशा केबल्स केवळ अमेरिका, युरोप व चीनशी जोडलेल्या होत्या. आता भारत हे नवं केंद्र तयार होत आहे आणि संपूर्ण दक्षिण गोलार्धाला एआय सेवा भारतातून पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे या विकसनशील जगाला अधिक वेगवान एआय सेवा पुरवणं शक्य होणार आहे.
याशिवाय भारतातील दहा कोटी लोकांना एआयचं मोफत प्रशिक्षण गूगलतर्फे दिलं जाणार आहे. म्हणजेच एआयचा लाभ फक्त काॅर्पोरेट्स पुरता मर्यादित न राहता सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे पोचणार आहे. त्यांना प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
गूगलचं असं मत आहे की यापुढील शंभर कोटी नवीन एआय युजर्सना सिलिकॉन व्हॅलीतून नव्हे तर भारतातून सेवा दिली जाणार आहे.
एआय क्रांतीची बस भारत चुकवणार नाही याची मोदी सरकारने खात्री केली आहे.
दिल्लीतलं एआय समिट प्रचंड यशस्वी ठरलं आहे. कुठल्यातरी एका खासगी विद्यापीठाने केलेल्या चौर्यकर्मावरून भारताने या क्षेत्रात उचललेल्या दमदार पावलांची कुचेष्टा करण्याचा आणि या समिटला अपशकुन करण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस आणि त्यांची दरबारी इकोसिस्टिम नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तोंडावर आपटली आहे.
अभिजित जोग (cooy pest)

