img 20250309 wa0009img 20250309 wa0009

सौ. मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादांनी पाडला नवीन पायंडा*

 

*जागतिक महिला दिन व मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन*

 

8 मार्च जागतिक महिला दिन आणि 9 मार्च सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर यांचा वाढदिवस.ह्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी आज वेगळेच घडले आणि सर्व उपस्थित भारावून गेले.

केदार एम्पायर, कर्वे रस्ता येथील शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना ओवाळायला थांबलेल्या भगिनींच्या हातातून ताट घेतले आणि सौ. मंजुश्री यांना स्वतः ओवाळले !!

पुरुषांनी सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान करणे व त्यांना समान वागणूक देणे हीच महिला दिनाची खरी भेट असल्याचे प्रतिपादन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोणत्याही पुरुषाने कुटुंबातच नव्हे तर कुठे ही महिलांना त्रास न देणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचेही मा

चंद्रकांतदादा म्हणाले !! हे सांगतानाच महिलांनीच कां पुरुषांना ओवाळायचे ? पाच पुरुषांनी महिलांना कां ओवाळू नये व त्यांचा सन्मान का करू नये, असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

तसेच आरोग्य शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहताना वेळोवेळी आरोग्य तपासणी साठी आणखी एक बस उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. तसेच आत्ता उपलब्ध असलेल्या एका बस मध्ये सर्व प्रकारच्या अद्यावत उपकरणे बसविणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.उदघाट्न प्रसंगी त्यांनी उपस्थित महिला डॉक्टर्स ना कॅडबरी देऊन त्यांचा देखील सन्मान केला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी,नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले,सुनील पांडे,मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सुभाषशेठ नाणेकर,सौ. कल्याणी खर्डेकर,राजेंद्र येडे, निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, अपर्णा लोणारे, मंगलताई शिंदे,सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, राम भिसे, विनायक गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एम एन जी एल च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेशजी पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ह्या उपक्रमाचे समन्वयक सुनील पांडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्तम संयोजन सुधीर फाटक,अनिकेत मंडाले, हर्षल होजगे, राहुल चौधरी, आकाश जाधव,सचिन पवार, रोहित मंडाले, अभिषेक पवार, अमोल जाधव, रोहित बाबर, सौरभ खंकाळ यांनी केले.

काल जागतिक महिला दिनानिमित्त पतित पावन संघटनेच्या माध्यमातून श्रावणधारा वसाहत येथे देखील आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पतित पावन चे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, मारुती धुमाळ, संजय येनपुरे इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी महिलांनी मंजुश्री खर्डेकर यांचा विशेष सत्कार केला व मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!