img 20250224 wa0008img 20250224 wa0008

इंदापूर तालुक्यातील रेडा येथे श्री संत सिध्देश्वर गुलाबबाबा व श्री काशिविश्वेश्वर यात्रा सोहळा मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ते गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री निमित्त तीन दिवस यात्रा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत गुलाबबाबा संस्थांचे अध्यक्ष अॅड .तानाजीराव देवकर व सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली.

 

पुढे बोलताना सांगितले की,यात्रा सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.२५) सकाळी गावांमधील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व श्री संत गुलाबबाबा, गजानन महाराज, साईबाबा , सर्जनाथ महाराज ,भैरवनाथ महाराज ,काशी विश्वेश्वर, दत्त महाराज, महालक्ष्मी, शंभू महादेव व पीर साहेब, वेताळ महाराज तसेच गावातील सर्वच ग्रामदेवताचे पूजा करण्यात येईल.

 

दुपारी सार्वजनिक भजन व संत गुलाबबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित गीतांचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ८ ते १० शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार, क्रीडा व अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर तालुका अजित पवार गटाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या उपस्थित होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये

जि.प. प्राथ. शाळा रेडा, कै. शहाजीराव पाटील विद्यालय, रेडा,जि.प. प्राथ. शाळा काठीमळा, रेडा सहभागी घेणार आहेत.

 

 

 

बुधवार दि.(२६) रोजी महाशिवरात्रि निमित्त श्रींची महापूजा सायं. ८ ते १० श्रींची भव्य छबिना ( मिरवणूक) व पालखी सोहळा हजारो भक्ताच्या उपस्थित निघणार आहे. तसेच गुरवारी (दि.२७)सकाळी१० ते १२ ह.भ.प. हनुमंत निकम महाराज (तोंडले) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

 

तसेच दुपारी केराभाऊ रामभाऊ जावळे (कालठण नंबर १) यांच्या वतीने महाप्रसाद वाटप होईल. सदर श्री संत गुलाबबाबा व काशी विश्वेश्वर यात्रेनिमित्त श्री संतगुलाब बाबाचे हजारो भक्त या यात्रेनिमित्त उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या यात्रासोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक ,धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमात काही बदल करण्याचा असेल तो अधिकार यात्रा कमिटी व श्री संतगुलाब बाबा संस्था असेल असे त्यांनी सांगितले.

________

सोबत फोटो:-

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!