
या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सर्वप्रथम मुलांनी दिंडी परिक्रमा घेतली त्यानंतर नामघोषणाच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदी उत्सवामध्ये सहभाग घेतला व नाचत नाचत हरिनामाचा जप करत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अभंग गवळण पोवाडे तसेच संतांचे महत्त्व व आषाढी वारीचे महत्त्व सांगितले तसेच कॅम्पसचे इंचार्ज सुधीर करगळ सर यांनी पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टाळ ,मृदंग, विना ,पालखी मोठ्या जल्लोषात पांडुरंगाच्या नामघोशात विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला तसेच चेतना फाउंडेशन मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.
अशाप्रकारे या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.
