‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय

– एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

 

मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारी, मतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहिती, त्याचसोबत आचारसंहिता बाबतची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हता, स्वीप उपक्रम, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच वाचकांसाठी हा विशेषांक dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.

[pdf_embed url=”https://namonewsnation.in/wp-content/uploads/2024/04/लोकराज्य-मार्च-एप्रिल-२०२४-.pdf”]

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!