पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील प्रत्येक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी : ना.डॉ.भारती पवार.

img 20230603 wa0014(1)

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नववर्षाच्या कार्यकाळात जनतेच्या विकासाच्या भरपूर योजना मंजुरी दिली असून त्या कार्यान्वित कराव्या. बऱ्याच योजनांची माहिती अजून लाभार्थींपर्यंत पोहोचलेली नसून या योजनांची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असे प्रतिपादन केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी केले. त्या भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंतस्मृती येथे सेवा सुशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यकाळातील जनहिताच्या राबवण्यात आलेल्या योजनांविषयीच्या माहितीसाठी राबवण्यात आलेल्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजयराव चौधरी, आ.देवयानी फरांदे, आ.राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण प्रभारी राजेंद्र गावित, भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे,

नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, प्रदेश सचिव अजय भोळे,नाशिक महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, नाशिक ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, भाजप जेष्ठ नेते विजय साने, सरचिटणीस सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे ,प्रवीण अलई, ग्रामीण सरचिटणीस नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, शंकर वाघ, गणेश कांबळे, बापू पाटील आदी उपस्थित होते.
ना.डॉ.भारती पवार पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींच्या गुड गव्हर्नन्स मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून आज भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पूर्णपणे सुरक्षित आहे. लाभार्थींना डायरेक्ट अकाउंट वर बेनिफिट ट्रान्सफर होत आहे. केंद्र सरकारचे लाभार्थ्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल जगभरात विविध देशांमध्ये लोकप्रिय ठरत असून त्या पोर्टल त्यांच्या देशांमध्ये राबवण्यात येईल का व त्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे. मोदींच्या कार्यकाळात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे ई वाहतूक असो किंवा वंदे भारत ट्रेन्स असो अशा विविध विकास कामांमुळे जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लोकप्रिय झाले आहे अशा त्या म्हणाल्या. शेवटी त्या म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचे प्रतिमा जगभरातून सावली व जगभरात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगमान्य झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता २४ तास उपलब्ध असून मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळासाठीचे जनसंपर्क अभियान व्यापक प्रमाणात यशस्वी होईल असे सांगून अभियानाविषयी बोलताना सांगितले की भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार आहेत. नाशिक लोकसभा जनसंपर्क अभियान प्रभारी आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. पुढं ते म्हणाले की ३१ मे ते ३० जून असा सुमारे महिनाभर महाजनसंपर्क कार्यक्रम चालणार आहे. या दरम्यान देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि बूथ स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. या वेळी शहर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी महाजनसंपर्क अभियानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध रचनांची माहिती दिली तर नाशिक ग्रामीण साठी महाजनसंपर्क अभियानासाठी लावण्यात आलेल्या विविध रचनांची माहिती नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले तर आभार जगन पाटील यांनी केले.यावेळी बैठकीस नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण येथील प्रदेश पदाधिकारी, कायम निमंत्रित सदस्य, महानगर पदाधिकारी महानगर मोर्चा/आघाडी/प्रकोष्ट अध्यक्ष व सरचिटणीस,मंडल अध्यक्ष व मंडल सरचिटणीस मोदीजी @ 9 अभियानाचे जिल्हा/मंडल बूथ संयोजक उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!