संपादक:- रामवर्मा आसबे

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारने केलेल्या मानधनातील वाढ ही जुलैपासून मिळणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगिलं आहे.*

*👉🟥🟥👉अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. पण वाढ होऊनही गेली दोन महिने मानधनात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्माऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती. अखेर आता जुलैपासून मानधन वाढ मिळणार असल्याने अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळणार आहे.*

*👉🔴🔴👉अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ ला घेतला होता. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना १० हजार आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ७ हजार २०० तर अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार होते.*

*👉🟥🟥👉या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे. पण त्यानंतर याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे वाढीव मानधन लवकरात लवकर मिळावे, यासाठी आग्रही होत्या.अखेर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात राज्य सरकारने केलेली वाढ जुलै महिन्यापासून सुरळीत मिळणार असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. शासनाने जरी १ एप्रिल २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या वाढलेल्या खर्चाची पुढील महिन्यात तरतूद करणार आहोत. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढलेल्या मानधनाची अमंलबजावणी करण्यात येईल, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!