मुंबई:- पती-पत्नी वेगळे झाल्यानंतर पोटगीबाबत मुंबईतील सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पतीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेचे उत्पन्न तिच्या विभक्त पतीपेक्षा चार लाख रुपये जास्त आहे.*

*👉🔴🔴👉महिलेने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. कमावत्या महिलेलाही पोटगी द्यायला हवी हे योग्य आहे, पण या प्रकरणातील परिस्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर महिला तिच्या विभक्त पतीपेक्षा जास्त कमावत असेल तर तिला पोटगीची गरज नाही. दुसरीकडे नवरा जास्त कमावत असला तरी परिस्थिती बघणे आवश्यक आहे.*

*👉🟣🟣👉न्यायमूर्ती सी.व्ही.पाटील म्हणाले की, याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. 2021 मध्ये महिलेने तिच्या सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुलाच्या जन्मानंतर तिला बळजबरीने तिच्या माहेरच्या घरी पाठवले होते. यानंतर न्यायालयाने पतीला मुलाचे संगोपन करण्यासाठी 10,000 रुपये दरमहा पोटगी देण्यास सांगितले होते.*

*👉🟥🟥👉महिलेने आरोप केला होता की, ती गरोदर राहिल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चारित्र्यावर आरोप केले. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लवकरात लवकर अंतरिम आदेश देणे आवश्यक असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. याप्रकरणी फार तपशिलात जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुलासाठी भत्ता देणे योग्य आहे पण स्त्रीला नाही. महिला मुलासाठी वेगळी पोटगी आणि स्वत:साठी वेगळी पोटगी मागायची, पण कोर्टाने वेगळी पोटगी देण्याची याचिका फेटाळून लावली.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!