इंदापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा.श्रीमती एस.डी. वडगावंकर यांनी काल दि.12/ 5/2023 रोजी भा.द.वि. कलम 279 अन्वये R.C.C.635/2019 या खटल्यामध्ये आरोपी नामे जुनेद सईद अहमद सय्यद यास तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता *अॅड.किर्ती कस्तुरे-गाढवे* यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 2/ 5/ 2019 रोजी सकाळी 10.00 वाजण्याचे सुमारास मौजे पोंधवडी ता.इंदापूर येथे पुणे-सोलापूर महामार्गावर सिनार्मास कंपनी जवळ सदरील अपघात झाला. अपघातामध्ये फिर्यादी श्री. राजेंद्र पांडुरंग कामटे हे अपघातग्रस्त वाहन चालवत होते. आरोपीने भरधाव वेगात येऊन त्याच्याकडील टाटा मांझा कारने पाठीमागून येऊन फिर्यादीच्या गाडीला जोरदार धडक दिली. फिर्यादीच्या मालवाहू अवजड वाहनास आरोपीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने फिर्यादीची गाडी महामार्गा लगतच्या सेवा रस्त्यावर डाव्या बाजूला पलटी झाली.आरोपीने अतिवेगाने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे गाडी चालवल्याने संबंधित अपघात झाला. सरकार पक्षातर्फे या खटल्यामध्ये चार साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. फिर्यादीचा जबाब, घटनास्थळ पंचनामा तसेच महामार्गावर गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सर्वस्वी आरोपीची होती, हा सरकारी वकीलांचा युक्तिवाद मे. कोर्टाने ग्राह्य धरला. सरकारी पक्षाने त्यांची बाजू सबळ पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आरोपीस या खटल्यामध्ये शिक्षा सुनावली.
तपासी अंमलदार व्ही.व्ही. मोरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक व्हि.बी.शेख यांनी काम पाहिले. API पवार भिगवन पोलीस स्टेशन यांचे या कामी सहकार्य लाभले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!