कोरोनाचा धोका वरचेवर वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या २५ हजारांच्या पुढे गेलीय. तर महाराष्ट्रात चार हजारांच्या पुढे कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.काल एका दिवसात ८०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.*

*👉🛑🛑👉त्यातच आता देशभरात १० आणि ११ एप्रिलदरम्यान कोरोना मॉक ड्रील होणार आहे. या दोन दिवसांमध्ये देशभरातील कोरोना परिस्थितीचा, उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल. याच अनुषंगाने राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरमध्ये मास्क सक्ती करण्यात आलीय.विठ्ठल मंदिर प्रशासनानेही मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातांना मास्क घालणं आवश्यक असणार आहे.*

*👉🔴🔴👉सध्या देशभरात २५ हजारांच्या पुढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात ३ जणांचा मृत्यू झालेला असून ८०३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३ हजार ९८७ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईतल्या अनेक रुग्णालयांनी मागच्या आठवड्यात कोरोनाचा धोका ओळखून कोविड वार्ड सज्ज ठेवलेले आहेत.*

*👉🟥🟥👉आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी १० आणि ११ एप्रिल दरम्यान देशभरात मॉक ड्रील होणार असल्याचं जाहीर केलं आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!