अभाविप इंदापूर शहरमंत्री पदी अजय चव्हाण यांची निवड.*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बारामती जिल्हा अभ्यासवर्ग सोमवारी बारामती येथील म.ए.सो. हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.
या अभ्यास वर्गासाठी इंदापूर,दौंड,पुरंदर,सासवड व बारामती येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अभाविप इंदापूर शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
अभाविप इंदापूर शहरमंत्री म्हणून अजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना अजय चव्हाण म्हणाले की विद्यार्थी व विद्यार्थिनी च्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधितांशी भेट घेऊन चर्चा व निवेदनाच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ.
प्रसंगी विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करू.
अजय चव्हाण यांच्या निवडीने इंदापूर पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!