*नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० लाख सर्वांसाठी घरे देण्यात येणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.या योजनेंतर्गत ४ लाख घरांचा टप्पा वेगळा बांधण्यात येणार आहे. त्यातील अंदाजे २.५ लाख घरे अनुसुचित जाती जमातींसाठी तर १.५ लाख घरे ही इतर प्र वर्गातील लोकांसाठी राखीव असणार आहे.*
*👉🔴👉मोदी आवास घरकूल योजना जाहीर*
*मोदी आवास घरकूल योजनेंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची उभारणी करण्यात येणार आहे. रमाई आवास योजेंतर्गत १.५ लाख घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यातील किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी बांधण्यात येतील. अर्थसंकल्पातील या योजनेंसंदर्भात ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -*
*👉🛑👉पंतप्रधान आवास योजनेची ठळक वैशिष्ट्ये*
*हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्ट्यांतील लोकांसाठी खाली नमूद केलेल्या योजनांच्या माध्यमातून घराच्या गरजा पूर्ण करण्याचे उदिष्ट् ठेवण्यात आले होते.*
*= झोपडपट्टीची जमीन हा स्त्रोत वापरून खाजगी विकासकांच्या सहभागाने झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन*
*- क्रेडिट लिंक्ड अनुदानाच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी परवडणा-या घरांना प्रोत्साहन.*
*- सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या भागीदारीतून स्वस्त/परवडणारी घरे.*
*- लाभार्थींच्या पुढाकाराने करण्यात येणारी खाजगी घरबांधणी किंवा सुधारणा यासाठी अनुदान.*
*👉🔴👉आवास योजनेतील पात्रता*
*प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेखाली पात्र ठरविण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांच्या कुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भारतात कोठेही पक्के घर नसावे.*