जनतेच्या नावाखाली बिल्डरांचा फायदा करतय महा अाघाडी सरकार – देवेंद्र फडणवीस

संपादकीय

राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील दौऱ्यावर आले असता इंदापुर मधून बावडा गावाच्या हद्दीत त्यांचे आगमन झाल्यानंतर अामदार रणजितसिंह मोहिते, उदयसिंह पाटील, सरपंच किरण पाटील व भाजप पदाधिकारी वर्गाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे बावडा येथे जंगी स्वागत केले त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा निरा नरसिंहपुरकडे रवाना झाला श्री क्षेञ निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिराला दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी भेट देऊन श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले.

लक्ष्मी-नृसिंह देवाची पूजा झाल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी सत्कार केला भाजप युवा मोर्च्याचे इंदापुर तालुका अध्यक्ष रामभाऊ आसबे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.तर दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना चहा दिला.यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदीसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्रिमंडळामध्ये काल बिल्डरांचा प्रीमियम कमी करण्यासंदर्भात जी वादावादी झाली ती जनहिता करता होती की स्वतःहिता करीता होती याचे उत्तर निश्‍चितपणे जनतेला हवे आहे.विशेषतः प्रिमियम कमी केल्यानंतर त्याचा जनतेला लाभ होणार आहे का हा प्रश्न आहे प्रीमियम कमी करण्याच्या पाठीमागचे नेमके गौडबंगाल काय ?यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत.आमची मागणी आहे की याचा फायदा ग्राहकांना कसा होइल अन्यथा जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला हे सरकार निघाले आहे असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मंत्रिमंडळातील मतभेद आहेत की नाही हे माहिती नसून विजेची भरमसाठ बिले कमी करत नाहीत गोरगरिबाला ते विज बिलासंदर्भात सुट द्यायला तयार नाहीत तर दुसरीकडे मात्र दारुचे परवान्यावर कोविडचा त्याच्या वर असर झाला आहे.त्याची फी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातायेत हे मात्र आश्चर्यकारक आहे असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.निरा आणि भिमा नद्यांचा संगमावरील क्षेत्र निरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे. लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस यांचे कुलदैवत आहे. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,प्रशांत परिचारक उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!