*पद..*
कोणत्याही माणसाचे महत्व *पद* मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही,तो त्या *पदाला* किती न्याय देतो तो किती कार्यक्षम,कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो… यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि *पद* मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो, *पदामुळे* तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, *पदामुळे* आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, *पद* कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे,असे माणसांशी वागले पाहिजे !,
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते जशी लोकप्रतिनिधीची झाली आहे
म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा,तरच लोक तुमच्या सोबत राहतील…!
ं समाजसेवा हिच खरी ईश्वर सेवा ं
*संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित*
*रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं…*
