*१ डिसेंबर : महार रेजीमेंट स्थापना दिन*
स्थापना – १ डिसेंबर १९४८
महार रेजीमेंट स्थापना दिनाच्या निमित्ताने सैन्यातील महार बटालियनला मानाचा क्रांतिकारी जयभिम !
काश्मीरच्या सीमेवर आमच्या दुसऱ्या महार बटालीयनने शौर्य व धैर्याचा जो लढा दिला, तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले. कुणी सांगावे आमची ही बटालीयन काश्मीर सीमेवर लढली नसती तर संपूर्ण काश्मीर, पाकीस्तानच्या घशात गेले नसते का? आमच्या बटालीयनने दाखवलेली वीरश्री पाहून बाबासाहेब गहिवरले.
सन १९४९ मध्ये डॉ.आंबेडकर या बटालीयनला भेट देण्यास काश्मीरला गेले. बाबासाहेब मिलिटरी प्रांगणात आले. साऱ्या सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा नाचत होती. बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघण्याचा लाभ त्यांना घडला होता.
डॉ.आंबेडकरांनी आपली प्रेमळ नजर चोहीकडे फिरवली. प्रत्येक सैनिक जवान आदराने नतमस्तक होउन उभा होता. आणि त्याचक्षणी बाबासाहेबांच्या टपोऱ्या डोळ्यात आसवे तरळली. एका क्षणात वातावरण गंभीर झाले. एक जवान बुटांचा खटखट आवाज करत बाबासाहेबांकडे येतो आणि म्हणतो…
“बाबा! काय झाल ते तत्काळ सांगा ! आम्ही तुमच्या करिता रक्ताचे पाट..”
परंतु त्या सैनिकाचे बोलणे संपण्यापुर्वीच बाबा म्हणतात…
“तसं काही नव्हे रे ! त्याच असं आहे !”
“काही वर्षापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी इंग्रजांनी हलक्या दर्जाची कामे करण्याकरता आपली माणसे देण्याबद्दल मला लिहिले होते.”
“मी त्यांना खडसावून सांगितले की, माझी माणसं शूरवीर आहेत. शत्रू सैन्याशी दोन हात करण्यास अन्य जमांतीपेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे. तुम्ही माझ्या लेकरांना दोन हात करण्याची संधी तर देऊन पहा. आणि इंग्रजांनी माझी शिफारस पाहून कामठी मध्ये पहिल्या महार बटालियनची स्थापणा केली. त्यानंतर सुमारे दोन वार्षानंतर दुसरी महार बटालियन स्थापन करण्यात आली.”
“तुम्ही लोकांनी, माझे शब्द खरे करून दाखविले. हे पाहून मला अत्यानंद होत आहे. माझ्या डोळ्यात तरळणारी हि आसवे समाधान व आनंदाची आहेत.”
बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून सर्वचजण गहीवरले. असे होते आपले बाबा. समाजासाठी अहोरात्र फक्त समर्पण. आणि म्हणुनच चैत्यभुमीवर बाबांना अभिवादन करण्यासाठी येणारा करोडोंचा समाज.
तसेच या बटालियनला गौरव पुर्ण ७२ वर्ष पुर्ण होत आहे आणि आज हि बटालियन जीवाची पर्वा न करता सदैव भारत भुमी च्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते.
आज या दिना निमित्त सर्व वीर जवानांना जयहिंद आणि पुढील वाट चालीस हार्दीक हार्दीक शुभेच्छा !
*~ लेखक : चं.पु. इलमे ~*
*संदर्भ : डॉ.बाबासाहेबांच्या आठवणी*
********************************

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!