🎯 _*‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू, नागरिकांचा होणार असा फायदा..!*_

♟️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मोदी सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकार या योजनेद्वारे आर्थिक क्षेत्रासह कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देणार आहे.

🔖 *‘पीएम गति शक्ती’चे फायदे*

▪️ पायाभूत विकासातील अडथळे दूर होतील. लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यवसायात सुलभता येईल. पायाभूत प्रकल्प कमी खर्चात, नियोजित वेळेत होतील.

▪️ देशात दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे एकात्मिक जाळे तयार केले जाईल. रेल्वे व्यापारात अधिक सुविधांसाठी 1600 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळेल. 35,000 किमी गॅस पाईपलाईन केली जाईल.

▪️ भारतमाला, सागरमाला, बंदरे, उद्यान, आर्थिक क्षेत्र, रेल्वे यांसारख्या पायाभूत उपक्रमांचा योजनेत समावेश केला जाईल. पुढील टप्प्यात रुग्णालये, विद्यापीठांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण केले जाईल.

▪️ हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी 220 विमानतळे, एअरड्रोम आणि एअर स्ट्रिप्स एकत्र बांधली जातील. एकूण 25 हजार एकरांवर 11 औद्योगिक कॉरिडॉर उभारले जातील.

▪️ संरक्षण क्षेत्रात 1.7 लाख कोटी उत्पन्नाचे लक्ष्य आहे. देशात 38 इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर, 109 फार्मा क्लस्टर विकसित होतील. शिवाय 90 टेक्सटाईल क्लस्टर किंवा मेगा टेक्सटाईल पार्कचे लक्ष्य निश्चित केले आहे.
➖➖➖

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!