“म्युकोरमायकोसिस( ब्लैक फंगस) म्हणजे काय?*
*काळजी व उपचार*
म्युकोर मायकोसिस
हा बुरशीजन्य रोग [ ब्लैक फंगस ] आहे.
हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.
कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते व
या रोगाला ला सुरुवात हाेते.
नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये,
तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात,
डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.
या बुरशीचा *पसराव अति वेगाने* असून
उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.
लवकर निदान झाले तर
औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो पण उशीर झाला तर
शस्त्रक्रिया पण करण्याची वेळ येते.
*रिस्क फॅक्टर्स*-
कोरोना सोबत खालील रोग असल्यास
म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते……
1. मधुमेह/डायबिटीज
2. HIV / AIDS .
3. जास्त वेळ व मात्रा मधे स्टेरॉइड्स चा वापर.
4. ब्लड प्रेशर
5. विविध कँसर
6. लिव्हर सिरोसिस
7. अति लट्ठपणा
*निदान करण्यासाठी लक्षणे*
*तोंड व दांत*
चेहर्यावर सज येणे,
तोंडातून दुर्गंधी येणे,
तोंडातून पु येणे,
हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे,
अचानक दात हालणे व पडणे,
दातांची जखम न भरणे.
*नाक*
सर्दी असणे
नाक बंद असणे
साइनस च्या जागेत दुखणे
नाकातुन रक्त येणे
नाक दुखणे
*डोळे*
डोळे दुखणे व सुजणे
डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे
*मेंदू*
डोके दुखणे
मेंदूच्या नसांचा त्रास होणे
*निदान कसे करणार*
1. *बायोप्सी (Biopsy)*
बुरशी च्या जागेतुन तुकड़ा काढून टेस्टिंग करणे.
2.नाकातुन स्वॅब घेऊन तपासणी /fungal culture
3. *रेडियोलॉजिकल*
#CT Scan or MRI PNS & orbit or brain
*वरील लक्षणे आढळ्यास*
*खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व*
*वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.*
1. दंतरोग तज्ञ
2. नाक, कान, घसा तज्ञ
3. नेत्र रोग तज्ञ
4. मेंदु रोग तज्ञ
5. फिजिशियन
*उपचार कसा करावा*
म्युकोर मायकोसिस चे निदान झाल्यानंतर खालीलप्रमाणे उपचार करावे
1. मधुमेह (systemic problems or predisposing factors) व इतर रोगांचा उपचार करून नियंत्रण करावे
2 *शस्त्रक्रिया*
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबड़तोब आवश्यकतेनुसार आपरेशन करून
खराब झालेले हाड़ व शरीराचा इतर भाग काढून घेणे.
3. *औषधोपचार*
#इंजेक्शन –
अँफोटेरीसिन बी
Amphotericin B
Plain /Lyposomal
#Tablet
इसावुकोनाझोल (Isavuconazole)
or
पोसैकोनझोल (Posaconazole)
*कोरोनाच्या संकटातुन बरे झाल्या नंतर म्युकोर मायकोसिस न हाेवो यासाठी घ्यावयाची काळजी*
1. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवा.
2. स्टेरॉइड चा गरजे पेक्षा जास्त वापर नको.
3.अॅक्सिजन थेरपी साठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर ह्युमिडीफायरसाठी करा.
4. रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
5. कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
उपचारासाठी –
*राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकॉसिस वर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच बरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत च्या रूग्णालयात ही हे उपचार मोफत होतील.*
*लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे*
*भिती नको काळजी हवी*
