हिंग*
*औषध एक – गुण अनेक*
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-३४ वा*
( २रा रविवार एप्रिल २०२१)

हिंगाचा उपयोग मुख्यतः फोडणीसाठी केला जातो. उत्तम प्रतीच्या हिंगाला उग्र वास असतो शुद्ध हिंग पाण्यात मिसळल्याने पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र बनते जरी भेसळ असेल तर तो खाली तळाशी चिकटून बसतो.
हिंगाच्या सेवनाने वायुसंस्था नियमित बनते,त्यामुळे त्याला वातनाड्यांची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते.
*गुणधर्म*
हिंग गरम,पाचक, रूचिकारक तसेच वायू, कफनाशक, श्वासहरक, अजीर्ण मलावरोध दूर करणारा आहे, गोळा उठणे पोट फुगणे व जंत यावर गुणकारक आहे परंतु हिंगापासून त्वरित फायदा मिळवण्यासाठी तो गरम पाण्यात कालवून किंवा तुपात भाजल्या शिवाय घेऊ नये. हिंग उष्ण आहे त्यामुळे उष्ण आणि पित्त प्रकृती असणार्‍यांनी हिंगाचे सेवन करू नये अगर कमी प्रमाणात सेवन करावे.त्याचबरोबर हिंग हे कामोत्तेजक आहे.
*उपयोग*
*१* अपचन,पोटातील त्रास,गोळा उठणे, अजीर्ण किंवा वायूमुळे होणाऱ्या उलट्या यासाठी तुपात भाजलेला हिंग,सुंठ, मिरे,पिंपळी,सैंधव मीठ, ओवा, जिरे आणि शहाजिरे या आठ वस्तू समप्रमाणात घेऊन चूर्ण बनवून काचेच्या बाटलीत भरून ठेवावे याला *हिंगाष्टक चूर्ण* असे म्हणतात हे चूर्ण उत्तम, साधे,पाचक व गॅस दूर करणारे आहे. अनेक रोगावरील एक रामबाण औषध आहे. जेवणापूर्वी तुप-भातातून किंवा जेवल्यानंतर ताकामधून घेतल्याने फायदा होतो.
*२* भाजलेला हिंग १ते२चिमट गरम पाण्यात घालून हळूहळू पिल्याने जुना खोकला, सर्दी,मलावरोध बरा होतो.
*३* फुफ्फुसाच्या आजारात हिंग खूप फायदेशीर असतो हिंग पाण्यात कालवून घेतल्याने कफ पातळ होऊन कमी होतो.
*४* हिंगाच्या सेवनाने वायु संस्था नियमित बनते यामुळे हिंगाला वातनाड्यांची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते.
*५* अन्नपचन न होता ते पोटात पडून राहते ,मलावरोध होऊन मल दूषित बनून सडू लागतो तेव्हा पोटात जंत निर्माण होतात अशा स्थितीत हिंग अत्यंत गुणकारी असतो.
*६* हिंगाचे सेवन केल्याने गर्भाशया आकुंचित होते,मासिक स्त्राव साफ होतो व स्त्रियांच्या उदर वेदना दूर होतात.
*७* पोटाला खूप तडस लागली असेल,पोट खूप फुगले असेल किंवा पोटात खूप दुखत असेल तर नाभीच्या भोवती पोटावर हिंगाचा लेप दिल्याने लगेच फायदा होतो.
*८* हिंग व कडूलिंबाची पाने वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये झालेली किडे मरतात.
*९* अर्धशिशी मध्ये हिंग पाण्यात कालवून त्याचे २-२थेंब नाकात सोडल्यास आराम मिळतो.
*१०* कान दुखत असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून ते तेल गरम करावे व त्याचे थेंब कानात सोडल्याने दुखावा थांबतो.
*११* दाढ दुखत असल्यास दाढेच्या पोकळीत हिंग ठेवल्याने दंतकृमी मरतात व हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दात दुखी मध्ये फायदा होतो.
*१२* हिंग मधात खलून त्यामध्ये कापसाची वात भिजवून ठेवावी व त्याचे काजळ तयार करावे हे काजळ डोळ्यात घातल्याने डोळ्यातून पाणी गळण्याचे बंद होते व डोळ्यांचे तेज वाढते.
*१३* हिंग व उडदाचे चूर्ण विस्तवावर टाकून तोंडात त्याची धुरी घेतल्याने उचकी थांबते.

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!