पुणे, दि. 17 : जिल्ह्यातील माजी सैनिक व नागरिकांना कळविण्यात येते की, सैनिकी मुलांचे वसतीगृह, पर्वती, पुणे येथे सहायक वसतिगृहअधिक्षक एक पद पुरुष निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक पात्र माजी सैनिकांनी व इतर नागरिकांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, पुणे दूरध्वनी क्र. 020-26122287 येथे संपर्क साधावा असे ले.क. हंगे स. दै. (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
