मुंबई : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सुरू होणाऱ्या नवीन फार्मसी महाविद्यालयांना राज्य शासनाकडून ‘ना हरकत दाखला’ (NOC) द्यावा लागणार असून, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी नवीन तसेच चालू असलेल्या फार्मसी महाविद्यालयांसाठी अर्ज मागवले होते. या परिपत्रकानुसार संबंधित राज्य शासन आणि विद्यापीठाचा NOC आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले नसल्यामुळे अनेक संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर, काही विनाअनुदानित संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यामध्ये *ऍडव्होकेट ऋषिकेश अजित मोहिते* यांनी संस्थांच्या वतीने प्रभावी युक्तिवाद सादर करत न्यायालयाकडून राज्य शासनाला NOC देण्याचे आदेश मिळवून दिले.
याआधीही शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अशाच प्रकारच्या प्रकरणात *ऍडव्होकेट मोहिते* यांनी यश मिळवून दिले होते. यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी हा लढा यशस्वीपणे लढवून संस्थांना न्याय मिळवून दिला आहे.
या यशाबद्दल संपूर्ण राज्यातील फार्मसी क्षेत्रातील विनाअनुदानित संस्थांकडून *ऍडव्होकेट मोहिते यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
