पुणे – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख २५५ व तडजोडचे ३८ हजार ५७० असे एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली काढण्यात आले आहेत.*

 

*👉🔴🔴👉लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद खटले १८, भुसंपादन १११, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ९९४, इतर दिवाणी ५१४, इतर २ हजार ६७३, महसूल ७ हजार ७३१, पाणी कर ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २ अशी एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.*

 

*👉🟥🟥👉तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९७ हजार ६४४ प्रलंबित प्रकरणांमधून ३८ हजार ५७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ३२० कोटी ६८ लक्ष १२ हजार ४०७ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व २ लाख ४२ हजार ९८७ दाव्यापैकी १ लाख २५५ दावे निकाली काढण्यात येऊन २५६ कोटी ७० लाख ९८ हजार ७४९ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ५७७ कोटी ३९ लाख ११ हजार १५६ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.*

 

*👉🔴🔴👉पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!