चांगली संगत मिळाल्यास यशाचे शिखर गाठता येईल : पी.आय.
मा. सूर्यकांत कोकणे
चुकीची संगत संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह शालेय व महाविद्यालयीन जीवनात योग्य लोकांची संगत मिळाल्यास जीवनात निश्चितच यशाचे शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन पोलीस इन्स्पेक्टर इंदापूर पोलीस स्टेशन माननीय श्री सूर्यकांत कोकणे यांनी केले.
सरडेवाडी इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस इन्स्पेक्टर कोकणे बोलत होते. यावेळी कोकणे यांनी सांगितले की, आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग देशसेवा च समाजसेवेच्या दृष्टीकोनातून केल्यास निश्चित यश मिळेल, यावेळी संस्थेचे सचिव श्री विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याध्यर्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्रे, विशेष पुरस्कर मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने कितना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ निकिता माने मॅडमआदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी केले सूत्रसंचालन वैष्णवी डोईफोडे आणि गीतांजली कांबळे यांनी केले तर आभार नम्रता मोरे यांनी मानले.