चेतना फार्मसी इंदापूर येथे ट्रॅडिशनल डे निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन
सरडेवाडी इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या डेमधून घडवले. बंगाली, घागरा, शेरवानी, नऊवारी साडी, कोळी वेशभूषा, पंजाबी यांसारख्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी या डेचा आनंद लुटला तसेच विद्यार्थ्यांनी विविध थीमद्वारे दुपारच्या सत्रामध्ये मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गणेश जयंती पंढरपूर वारकरी दिंडी सोहळा तसेच शिवजन्मोत्सव असे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले. सदर कार्यक्रमाचे संयोजन कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक नम्रता मोरे यांनी पाहिले तर प्राचार्य डॉ सुजित देसाई चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले.