5be3f47118da47ab91d57758a6de59c85be3f47118da47ab91d57758a6de59c8

दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी भूषविले.तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे चेतना फाउंडेशन इंदापूरच्या संचालिका सौ निकिता माने मॅडम उपस्थित होत्या.

 

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणात पार पडला.

 

क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित कापून,तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नारळ फोडून मशाल पेटवून केले.

क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हॉलीबॉल,

थ्रो बॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो गोळा फेक, 100 मीटर रनिंग, रस्सीखेच इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा तितकेच महत्त्व दिले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किमान एक तास तरी मैदानावरती घालवला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा खेळाची आवड निर्माण होईल. डॉ. देसाई पुढे म्हणाले कोणत्याही खेळामध्ये जिंकणे आणि हरणे हा एक त्या खेळाचा भाग आहे पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्या खेळामध्ये सहभाग नोंदवने व त्या खेळाचा आनंद घेणे. शेवटी प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व क्रीडा महोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन केले.

 

प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.

यावर्षीच्या क्रीडा महोत्सवाचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक सुरज माने सर व श्री प्रवीण सुर्वे सर यांनी काम पाहिले.

क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव श्री विलास भोसले आणि खजिनदार श्री सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!