पुणे:- पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुणे महागर पालिकेने पुढाकार घेत ज्या ठिकाणी दवाखान्यात या आजाराने बाधित रुग्ण आहेत, त्या दवाखान्यात या आजारावरील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेतर्फे आरोग्य अधिकारी नेमला जाणार आहे. तसेच पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात या आजाराने बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी ५० बेडसह १५ आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत.*
*👉🔴🔴👉पुण्यात रविवारी आणखी २८ जीबीएस बाधितांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यात जीबीएस बंधितांचा आकडा हा १०१ वर पोहोचला आहे. तर सोलापुरातील एका तरुणाचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २३ रुग्ण ५० ते ८० वयोगटातील आहेत. ९ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेला पहिलं रुग्ण हा पुण्यात आढळेलेला पहिले रुग्ण असल्याचं मानलं जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. असे म्हटले जात आहे की जगभरातील सर्व जीबीएस प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे सी. जेजुनी विषाणूमुळे उद्भवतात. त्याचबरोबर यामुळे अनेक गंभीर संक्रमण देखील होत असल्याचं पुढ आलं आहे. सध्या विशेषत: ज्या भागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत, त्या भागात प्रशासनाकडून पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत.*
*👉🅾️🅾️👉खडकवासला धरणाजवळील विहिरीत शनिवारी ई.कोलाय या जीवाणूचे प्रमाण अधिक आढळले, मात्र या विहिरीतील पाण्याचा वापर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा आणि अन्न गरम करून खाण्याचा तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्याच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या ६८ वर्षीय महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, उपचारात एकूण १३ इंजेक्शनचा वापर करण्यात आला. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत प्रशासनाला खबरदा रीच्या सूचना दिल्या आहेत. पवार म्हणाले की, जीबीएसबद्दल मला समजले की या विशिष्ट आजाराचे उपचार महाग आहेत, त्यामुळे मी जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील बाधितांवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांवर पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात या आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत.यासाठी ५० बेडसह १५ आयसीयू आरक्षित करण्यात आले आहेत, असे पवार म्हणाले.*