श्रीनगर:- जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बाधल गावात गुढ आजार बळावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आजारामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या गूढ आजारामुळे या गावातील १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रविवारी या गावातील रहिवासी मोहम्मद अस्लम यांच्या सहाव्या आणि शेवटच्या मुलीचा या गूढ आजारामुळे मृत्यू झाला. जम्मूतील एका रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या गूढ आजाराचे कारण काय? गावातील नागरिकांचा मृत्यू कशामुळे होतोय? या सर्वामागचे कारणं शोधण्यासाठी केंद्रीय पथक गावामध्ये आले असून ते तपास करत आहेत.*
*👉🟥🟥👉बाधल गावामध्ये गूढ आजाराने नागरिकांचा मृत्यू होण्यास डिसेंबरपासून सुरूवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण १७ जणांनी या आजारामुळे आपले प्राण गमावले. या गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून एक आंतरमंत्रालयीन पथक राजौरीला पोहोचले आहे. सोमवारी ते घटनास्थळी दाखल होत तपास करतील. यापूर्वी यागावामध्ये असलेली विहिर सील करण्यात आली आहे. दिल्लीहून एक आंतर-मंत्रालयीन टीम पाहणी करण्यासाठी राजौरी येथे पोहोचली. मोहम्मद अस्लम या गावकऱ्याने शुक्रवारपर्यंत आपली पाच मुले गमावली होती. तर रविवारी त्यांच्या यास्मीना अख्तर जान (१६ वर्षे) या सहाव्या आणि शेवटच्या मुलीचा देखील मृत्यू झाला. तिला गेल्या रविवारी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून सोमवारी तिला जम्मूला रेफर करण्यात आले.*
*👉🔴🔴👉जम्मूमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि असोसिएटेड हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. आशुतोष गुप्ता यांनी यास्मिनाच्या मृत्यूची पुष्टी केली आणि पत्रकारांना सांगितले की, पहिल्या दिवसापासून तिची प्रकृती चिंताजनक होती. मोहम्मद अस्लम यांनी याआधी चार मुली, दोन मुलं आणि त्यांचे मामा आणि मावशीला गमावले आहे. ‘फातिहा’ कार्यक्रमात जेवण केल्यानंतर आठवडाभरात फजस हुसैन आणि रोबिया कौसर (दोघेही १४ वर्षे), फरहाना कौसर (९ वर्षे) रफ्तार (५ वर्षे) आणि रुखसार (११ वर्षे) हे सर्वजण आजारी पडले. या गूढ आजारामुळे या सर्वांचा ३१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये दोन कुटुंबामध्ये झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकासह प्रमुख वैद्यकीय संस्थांमधील तज्ज्ञांची एक टीम पाठवली होती. फिरत्या प्रयोगशाळेच्या वाहनाने सुसज्ज असलेल्या या पथकाने जम्मू-काश्मीर राज्यातील प्रकरणे आणि मृत्यूंची तपासणी करण्यासाठी कोटरंका येथे तळ ठोकला.*
*👉🟥🟥👉शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या सहा आठवड्यांमध्ये या गूढ आजारामुळे मृत्यू झाल्यामागची कारणे शोधण्यासाठी राजौरी जिल्ह्यातील एका गावाला भेट देण्यासाठी आंतर-मंत्रालयीन उच्चस्तरीय पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बाधल गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला या गूढ आजारामागचे कारण काय आहे याचा तपास जलद गतीने करण्याचे निर्देश दिले. तपासणीदरम्यान आरोग्य पथकांनी गूढ आजाराने बाधित क्षेत्रातील ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, पाणी, अन्न आणि इतर सामग्रीचे नमुने गोळा केले आणि त्यांची चाचणी केली. पण इन्फ्लूएंझासह सर्व चाचणी परिणाम नकारात्मक आले. या नमुन्यांमध्ये न्यूरोटॉक्सिन आढळल्यानंतर गूढ आजारामुळे मृत्यू झाल्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापन केली आहे. अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबांची तीन घरे सील केली आहेत आणि त्यांच्या जवळच्या २१ नातेवाईकांना सरकारी निवासस्थानामध्ये हलवले आहे आणि त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे.*