चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला.
आज दिनांक 3/1/2025 वार शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे ,सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने , चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रिन्सिपल डॉ.सुजित देसाई सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगितली . चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे यांनी विद्यार्थी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिक्षिका प्रांजली सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेघना जगताप यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम घेण्यात आले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!